जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील कुसडगांवचे सुपूत्र व माजी सरपंच डॉ.प्रदिप कात्रजकर यांचे चिरंजीव अजय कात्रजकर यांनी चिदानंद प्रतिष्ठान वारले माळवाडी, कर्वेनगर, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे श्री शरीरसौष्ठव स्पर्धेमधे प्रथम क्रमंक मिळवला असुन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती येथे त्याचा सत्कार करण्यात आला.
दि. २३ डिसेंबर रोजी झालेल्या या सत्कार समारंभासाठी भारतीय जनता पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रवींद्र सुरवसे, खर्डा गटाचे जिल्हा परिषद सदस्य आनिल लोखंडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पिंपरखेड सरपंच बापुराव ढवळे, बाजीराव गोपाळघरे, धनेगावचे सरपंच महेश काळे, नानासाहेब गोपाळघरे, सुनिल हजारे, बाळासाहेब गोपाळघरे, सुभाष जायभाय, वैभव कार्ले, प्रविण कार्ले, बंडू कार्ले, रोहित कार्ले, राहूल पवार, मंगेश कार्ले, राहूल कार्ले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल अजय कात्रजकर यांचे राजकीय व क्रीडा क्षेत्रासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट
अजय कात्रजकर पुणे श्री ही मनाची स्पर्धा जिकूंन जामखेड तालुक्याच्या नावाचा गौरव वाढविला आहे. तसेच ग्रामीण भागातूनही अशा स्पर्धा जिंकता येतात हे सिद्ध करून दाखविले आहे. यामुळे ग्रामीण खेळाडूना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.
डॉ. प्रदीप कात्रजकर
( अजय कात्रजकर यांचे वडील)









