जामखेड प्रतिनिधी
बाहेरच्या देशातील लोक भारतात येतात येथिल वनस्पतींचा अभ्यास करून औषधे म्हणून वापरतात आणी भारतातील लोक आजारावर बाहेरच्या देशातील औषधे वापरतात. या औषध व गोळ्या घेऊन आजाराचे समुळ उच्चाटन होत नाही त्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आपण आजारी पडलो कि घाबरतो. व आपल्या भीतीचा गैरफायदा घेणार्या विकृती वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. असे मत निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यानी व्यक्त केले.

सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे यांनी डॉ. स्वागत तोडकर यांचे मोफत निसर्गोपचार महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात महाराष्ट्र भरातुन आलेल्या सुमारे 2700 व्यक्तींची तपासणी डॉ. तोडकर यांनी केली व उपाय सुचविले सायंकाळी ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, संजय वराट सर, अश्विनीताई आजबे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. तोडकर म्हणाले की, झाडे हे आपले मित्र आहेत त्यांना चांगले जपा ते आरोग्यासाठी खुपच उपयोगी आहेत. प्रत्येक झाड हे कल्पवृक्ष आहे. झाडपाला व फळांच्या योग्य वापरामुळे आपण कोणत्याही आजारावर मात करू शकतो. सध्या मोठ्या प्रमाणावर चहा सेवन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचे खुपच दुष्परिणाम होतात. त्यामुळे चहा टाळा, अॅल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवणे बंद करा. यावेळी त्यांनी कांदा, बदाम, चिक्कू, उंबर, गुळ शेंगदाणे, काळे फुटाणे, मुरमुरे, ताक, उडीद, हरभरे यांचे महत्त्व सांगितले.
यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, झाडे ही आपली आठवण असतात आपल्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती असतात संक्रांतीचा वाण म्हणून प्रत्येकाने नगरपरिषदे ला एक झाड द्यावे असे आवाहन केले सध्या आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आगळेवेगळे बसस्थानक जामखेड मध्ये होणार आहे. तसेच रस्ते होत आहेत. नदी सुशोभीकरण सुरू आहे. आपणास स्वच्छ सर्वेक्षणात नंबर आणावयाचा आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे यांनी आभार मानले.

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आतापर्यंत पदरमोड करून अनेक मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी रस्ते वीज व पाणी समस्या सोडविल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात बोअरवेल घेतल्याने रूग्ण व नातेवाईकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल पाच हजार मुलांसाठी बंद रस्ता सुरू करून पेव्हिंग ब्लाॅक बसवून दिल्याने सोय झाली, शाळा डिजिटल करण्यासाठी मदत केली. कोविड काळात मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले, तसेच बंद रस्ते सुरू करून मुरमीकरण केले. आणी आतातर भव्य दिव्य असे आरोग्य शिबीर घेतले सुमारे तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी या आरोग्य शिबीर व व्याख्यानाचा लाभ घेतला. पदरमोड करून समाजासाठी अहोरात्र झटणारा खरा समाजसेवक म्हणून लोक रमेश ( दादा.) आजबे यांचे कौतुक करत आहेत.
