जामखेड प्रतिनिधी
हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती
उत्सव जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील नळी वडगाव येथील वृध्दाश्रमातील वृध्दांना फळे व अल्पोपाहाराचे वाटप करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रासकर, अरविंद ठाकरे, शहरप्रमुख गणेश काळे, उपप्रमु अविनाश बेलेकर, युवासेना प्रमुख सुहास मदने, जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गुंदेचा, कैलास खेत्रे यांच्या सह अनेक शिवसैनिक व वृद्धाश्रमातील महिला व पुरुष हजर होते.

शहरासह तालुक्यातील खर्डा, पाटोदा, अरणगाव, डोणगाव, नान्नज, जवळा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.