जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेस प्रधानमंत्री आवास योजना “सर्वांसाठी घरे-२०२० BLC घटक क्रमांक-४ अंतर्गत वैयक्तिक लाभार्थीना ९३३ घरकुलांचा/लाभार्थीसाठी प्रकल्प मंजुर आहे. ९३३ पैकी बांधकाम परवानगी ६३० घरकुलांना दिली आहे. त्यापैकी ३६० लाभार्थीनी काम सुरु केलेले आहे. त्यापैकी १४०
घरकुले पूर्ण झालेली आहेत. अन्य घरकुले बांधकामाच्या विविध टप्प्यावर आहेत. एकूण मंजूर अनुदान रक्कम रुपये – २.५ लक्ष प्रती घरकुल. नगरपरिषदेकडे घरकुलांसाठी निधी उपलब्ध असून उर्वरित लाभार्थीनी बांधकाम परवाना घ्यावा त्याच प्रमाणे बांधकाम परवाना प्राप्त लाभार्थीनी तातडीने काम सुरु करावे. विविध टप्प्यावरील बांधकाम
पूर्ण झाल्यानंतर तात्काळ तीन दिवसांत अनुदान खात्यात जमा केले जाते. तरी घरकुल योजनेचा सर्व
लाभार्थीनी लाभ घ्यावा. लाभार्थीना माफक किंमतीत (रु.१०००) मध्ये बांधकामाचा आराखडा तयार करून
देणेसाठी नगरपरिषद सर्व साधारण सभेने तीन खाजगी वास्तुविशारदांची निवड केलेली आहे. तरी
लाभार्थीनी याबाबतचाही लाभ घेऊन लवकरात लवकर बांधकाम परवानगी घ्यावी व घरकुल बांधकाम पूर्ण
करावे असे आवाहन करण्यात येत आहे. असे नगराध्यक्ष निखिल घायतडक व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी आवाहन केले आहे.