जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील जामखेड येथिल ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सव 2021 निमित्ताने “गाव सेवा हिच खरी ईश्वर सेवा” या विषयावर आदर्श गाव पाटोदा ता. जि. औरंगाबाद चे भास्करराव पेरे पाटील यांचे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी व्याख्यानाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामीण विकास केंद्र संचलित लोकाधिकार आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अॅड डॉ. अरुण जाधव यांनी केले आहे.

या कार्यक्रमात सामाजिक कृतज्ञता पुरस्कार व लोककलावंत पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे यामध्ये मनोरंजनातुन प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता निवारा बालगृह समता भुमी मोहा फाटा बीड रोड जामखेड येथे होणार आहे.
नुकत्याच तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या आहेत. गावातील गाव कारभाऱ्यांनी निस्वार्थपणे गावाची सेवा केल्यास गावे हि सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत यासाठी तर आदर्श गावाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
अॅड. डॉ. अरुण जाधव हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात समाजातील दुर्लक्षित वंचित निराधार लोकांच्या न्याय हक्कांसाठी झटणारा, निराधारांची दिवाळी साजरी करणारा, त्यांना निवारा देणारा, मदारी लोकांना हक्काचे घर मिळवून देणारा गावकुसाबाहेरच्या लोकांची चूल पेटवणार वंवंचितांचा कैवारी कर्मयोगी सामाजिक कार्यकर्ते अरूण जाधव आहेत. आतापर्यंत अनेकांना निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतचा कारभार नियमानुसार व्हावा म्हणून हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
खूप छान 👌👍