जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा आयडियल वर्गाचे उद्घाटन सुभेदार मेजर होशिंग सदानंद बाळकृष्ण, देशमुख शशिकांत सचिव दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड, कॅप्टन लक्ष्मणराव गोविंदराव भोरे, सुभेदार मेजर दिनकर उद्धवराव भोरे, माजी सैनिक बजरंग डोके जामखेड तालुका माजी सैनिक तालुकाध्यक्ष,
हवालदार कांतीलाल पांडुरंग कवादे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपप्राचार्य पोपट जरे, पर्यवेक्षक रमेश आडसुळ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते या वर्गाचे उद्घाटन झाले.

आजच्या व्यवसायिक युगात वाणिज्य शाखेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.आज विद्यार्थ्यांना वाणिज्य व उद्योग जगताचे महत्व याचे ज्ञान प्राप्त करणे ही एक काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वाणिज्य विभागातर्फे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक संभाजी शेटे आणि विभागातील सर्व प्राध्यापक यांनी वाणिज्य शाखेतून मिळणाऱ्या विविध संधी व 12 वी वाणिज्य नंतर विविध कोर्स त्यामध्ये डिग्री कोर्स, डिप्लोमा कोर्स व विविध विभागातील संधी असतील त्यांची माहिती फलक वर्गाच्या दर्शनी भागावर तसेच वर्गामध्ये वाणिज्य विषय कॉमर्स त्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी कॉमर्स पासून ते एम कॉम,सीए, सीएस अशा विविध उपयोगी माहिती आणि राज्यातील पायाभूत गोष्टी अभ्यास अकाउंट विषयांमध्ये असणाऱ्या बारीकसारीक बाबी की ज्या स्पर्धापरीक्षा,अर्थ विभागाच्या परीक्षा, बँकिंगच्या परीक्षा त्या सर्व संबंधित व विविध कंपन्या संस्था यांच्या स्थापना भांडवल व सेक्रेटरी की जे सर्व एमबीए,बी बी ए,सी एस अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे ज्ञान यासाठी वर्गांमध्ये ही सर्व माहिती की जी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना भविष्यकाळात व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये व बँकेमध्ये नक्कीच याचा उपयोग होईल.
त्याचबरोबर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारे विविध प्रकारचे चेक कसे आहेत याची माहिती फलकाद्वारे वर्गामध्ये लावण्यात आलेली आहे.
अशी अतिशय उपयुक्त माहिती वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी कलेक्शन करून वर्गामध्ये अतिशय सुंदर अशा डिजिटल बोर्ड वर तयार करून लावण्यात आली आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर सतत राहील व या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये त्यांना होईल यात शंका नाही. काळाची गरज ओळखून प्रा.संभाजी शेटे यांनी अतिशय मेहनत घेतली.तयार केलेला हा आदर्श वर्ग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खरोखरच उपयुक्त आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सोशल डिस्टंसिंग ठेवून उपस्थित होते.





