जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सन १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या विजयी दिवसानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड येथील प्रहार सैनिक कल्याण संघ व आजी माजी सैनिक तसेच शिवनेरी करिअर अकॅडमी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी १६ डिसेंबर १९७१ रोजी भारत व पाकिस्तान युध्दात शहिद झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शिवनेरी करिअर अकॅडमीच्या वतीने विजयी दिवसाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसारच याही वर्षी उद्या दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी सुभेदार मेजर वाॅरंट आॅफिसर सदानंद बाळकृष्ण होशिंग हे प्रमुख पाहुणे तर जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
तरी समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, आजी माजी सैनिक अशा विविध मान्यवरानी उपस्थित राहावे असे आवाहनप्रहार सैनिक कल्याण संघ व आजी माजी सैनिक तसेच शिवनेरी करिअर अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे शिवनेरी अकॅडमी, बीड रोड जामखेड सकाळी अकरा वाजता होईल तरी मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे प्रमुख कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले आहे.