वाहन गुणवत्ता आश्‍वासन नियंत्रणालयाच्‍या वतीने 17 डिसेंबर रोजी संरक्षण साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

0
244
जामखेड न्युज – – – 
 संरक्षण दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी देशभरात ठिकठिकाणी भारतीय लष्काराकडून संरक्षण साहित्‍य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहन गुणवत्ता आश्‍वासन नियंत्रणालय, संरक्षण मंत्रालय, अहमदनगर यांच्यातर्फे 17 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 वाजेपर्यत वाहन गुणवत्ता नियंत्रणालय परिसर, महानगरपालिका भवनाजवळ, औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे  प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आले आहे.
            या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे संरक्षण साहित्य, रणगाडे, लढाऊ लष्कारी वाहने, दहशतवादी हल्यावेळी वारण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणेनी सज्ज वाहने, युध्दामध्ये वापरण्यात येणारे व कमी वेळेत अंथरता येतील असे पूल, न्युक्लीयर तसेच जैवरासायनीक अस्त्रांपासून सुरक्षित असणारे लष्करी साहित्यांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला जिल्‍ह्यातील सन्माननीय आणि मान्यवर व्यक्ती भेट देणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचा  नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्नल पुरव कौशल उप नियंत्रक (आस्‍थापना) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here