दिवसाढवळ्या बीडमध्ये तरुणाचा खून!!!

0
333
जामखेड न्युज – – – 
बीड शहरात थरार उडवून देणारी घटना घडली . अज्ञात तीन ते चार जणाच्या टोळक्याने एका 24 वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला चढवला . तरुणाच्या अंगावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला .
पोलीस प्रशासनावर जनतेचे प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतांना दिसत आहे.??
इतक्या रहदारीच्या व बँकेजवल पोलीस असताना मर्डर कसा होतो हा मोठा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होतांना दिसत आहे.
त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले . सदरची घटना बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर घडली . बीड शहरातील खासबाग भागात राहणारा 24 वर्षीय शेख शाहिद शेख सत्तार या तरुणावर आज दुपारी 4 वा . बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर तीन ते चार तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले . दिवसाढवळ्या सशस्त्र हल्लेखोरांनी तरुणावर सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला . त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले . हल्लेखोर कोण ? याचा शोध पोलीस घेत असून एका संशयीताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे . सदरची घटना का व कशासाठी घडली हे अद्याप समजू शकले नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here