जामखेड न्युज – – – –
खाद्यतेलाच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला केंद्र सरकारकडून थोडासा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात ८ ते १० रुपयांनी खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तर येत्या काही महिन्यांमध्ये खाद्य तेलाच्या किमती प्रति लीटर३ ते ४ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन व शेंगदाण्याचे उत्पादन वाढले
गेल्या ३० दिवसांत खाद्यतेलाच्या किमती सुमारे ८-१० रुपयांनी कमी झाल्या आहेत.’ एसईएने सांगितले की, त्यांचे सदस्य ग्राहकांना कमी किमतीचा लाभ देण्यासाठी तत्पर पावले उचलत आहेत. दरम्यान, भारतात आता जवळपास १२० लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. तर ८० लाख टन शेंगदाण्याचे उत्पादन झाले आहे.
किमती आणखी ३-४ रुपयांनी कमी होऊ शकतात
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन या उद्योग संघटनेने ही माहिती दिली कि, जागतिक बाजारातील मंदीमुळे खाद्यतेलाच्या किमती आणखी ३-४ रुपयांनी कमी होऊ शकतात. एसईएचे अध्यक्ष चतुर्वेदी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल सारख्या सर्व तेलांच्या चढ्या किमतीमुळे भारतीय ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. एसईएने दिवाळीपूर्वी आपल्या सदस्यांना तेलाच्या किमती कमी करण्याचा सल्ला दिला होता.’ तसंच केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्कही कमी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतात खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.





