म्हाडाचा पेपर फोडणाऱ्या तिघांना अटक १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी

0
241
जामखेड न्युज – – – 
आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पेपरफुटीचा तपास करताना म्हाडाच्या पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. आरोग्य विभागाच्या पेपरा फुटीचा तपास सुरु असताना म्हाडाच्या पेपर फुटी संदर्भांतही सातत्याने माहिती समोर येत होती. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनाही सारख्या सांगत होत्या की म्हाडाचा पेपर फोडण्याच्या तयारीत काही लोक आहेत. त्यानुसार आम्ही माहिती घेत आमच्या टीम तयार केल्या. पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे याठिकाणी या टीम पाठवण्यात आलया आमचा संशय खरा ठरला पेपर फोडणाऱ्या काही लोकांना आम्ही ताब्यात घेतल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. म्हाडाच्या पेपरफुटी संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईबाबत पोलीस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
असा उलटवला डाव
सुरवातीला आम्हाला औरंगबादला काही क्लासेस चालवणारे लोक भेटले.त्यांच्या मोबाईलयामध्ये काहीआक्षेपार्ह गोष्टी आढळल्या , त्यात आरोग्य भरतीच्या पेपरसंदर्भातही माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्याकडं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे डॉक्युमेंट्सही आढळून आली. यात आज परीक्षा देणाऱ्या तीन परीक्षार्थींचे अडमीटकार्ड आढळून आले. यातूनच आम्हाला माहिती मिळाली. पुढे हरकळ ब्रदर्सपण यामध्ये काही तरी घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्याच वेळी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखही त्यांच्या गाडीत आढळून आला. देशमुखाकडे लॅपटॉप होता, त्याच्या काही मॉडेल प्रश्नपत्रिका होत्या. तसेच अनेक पेनड्राईव्ह ही मिळून आले.
हरकळ बंधूंच्या मोबाईल वर फोनवर येत होते
पोलिसांनी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखसह हरकळ बंधूला अटक केली. तेव्हा त्यांच्या फोनवर सातत्याने फोन येत होते. त्यानंतर सर्व माहिती म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देत त्यांच्यासोबत जॉईन समन्वयाने ही करवाई करण्यात आली. त्यानंतर पुणे म्हाडाचे नितीन माने पाटील , मुख्य अधिकारी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर गृहखात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली.
आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत दिली पोलीस कस्टडी
जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखसह हरकळ बंधूला अटक करून आज कोर्टात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये जे लोक ताब्यात घेतले आहेत, त्याचा पेपर फुटीशी असलेला संबंध तपासाला जात आहे. या लोकांनी कुणाला पेपर दिलेत याचाही तपास सुरु आहे. म्हाडाच्या या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here