Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या एच. यु. गुगळे पतसंस्थेत साहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांच्या हस्ते क्यु आर...

एच. यु. गुगळे पतसंस्थेत साहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांच्या हस्ते क्यु आर कोड सुविधेचा शुभारंभ

0
295
जामखेड प्रतिनिधी  
              जामखेड न्युज – – – 
आजच्या स्पर्धेच्या युगात काळजी गरज ओळखून वित्तीय संस्थांनी ग्राहकांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची गरज ओळखून उद्योजक रमेश गुगळे यांनी आपल्या जामखेडमध्ये अग्रगण्य असलेल्या एच.यु गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  एच. यु. गुगळे नागरी सहकारी पतसंस्था ही अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक पहिलीच पतसंस्था असू शकते की जिथे क्यूआर कोडची सुविधा असावी असे प्रतिपादन सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी केले.
     नुकतेच एच.यु. गुगळे पतसंस्थेच्या क्युआर कोडचे वितरण सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांच्या हस्ते बँकेच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी चेअरमन रमेश गुगळे, दिलिप गुगळे, आशोक गांधी, व्यवस्थापक वैभव कुलकर्णी, कँशिअर जूबेर पठाण, श्याम पंडित, विठ्ठल कुलकर्णी, इंगळे मँडम, सांगळे मँडम, मिलिंद भिडे, प्रशांत कुलकर्णी, इलेक्ट्रिकल व्यापारी मनिष तिनीया, महेंद्र अष्टेकर, फिरोज पठाण, विनोद जाधव, रामेश्वर सुर्यवंशी, दत्तात्रय जगताप आदी उपस्थित होते.
एच.यु. गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे यांच्या संकल्पनेनुसार ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी पतसंस्थेचे सहकारी सातत्याने प्रयत्नशील असतात.  शेतकऱ्यांना बीनव्याजी कर्ज, इलेक्ट्रिकल वाहनासाठी कर्ज, महिला बचत गटाच्या माध्यमातून २५०० महिलांना कर्ज, मोबाईल अँप सुविधा, सोने कर्ज, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज आदी सुविधा देत ग्राहकांची सुरक्षितता व विश्वसनीयता बँकेने कायम जपली आहे.
क्युआर कोड मुळे ग्राहक कधीही आपल्या गरजेनुसार कोणत्याही ठिकाणाहून पैसे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. या सुविधेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एच.यु गुगळे पतसंस्थेचे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!