Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या नवनियुक्त केंद्रप्रमुख मल्हारी पारखे यांचा शिक्षण परिषदेमध्ये सत्कार

नवनियुक्त केंद्रप्रमुख मल्हारी पारखे यांचा शिक्षण परिषदेमध्ये सत्कार

0
340

जामखेड प्रतिनिधी

               जामखेड न्युज – – –
 नागेश विद्यालय जामखेड मध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित शिक्षण परिषद क्रमांक सहा मध्ये साकत केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख मल्हारी पारखे यांचा सत्कार करण्यात आला.
      शिक्षण परिषदेमध्ये आयोजित उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश तांबे साहेब, केंद्रप्रमुख नारायण राऊत, माजी केंद्रप्रमुख हापटे मामा यांच्या सह साकत केंद्रातील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
   साकत केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणुन मल्हारी पारखे यांच्याकडे पदभार दिलेला आहे त्यामुळे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला आला.
 
       शिक्षण परिषदेमध्ये गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी भेट दिली व सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी पुर्ण वेळ अध्यापन करावे शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसवावे व जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थी होतील यासाठी प्रयत्न करावेत. सध्या नविन शैक्षणिक धोरण येत आहे त्यामधे आपण टिकले पाहिजे. प्रत्येकाने प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवावे असेही सांगितले.
    या शिक्षण परिषदेमध्ये मुलांच्या भाषा समृद्धीच्या वाटा – सुदाम वराट, अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न – सानप मॅडम, भाषिक कौशल्य – नागरगोजे वाय. के., सायबर सुरक्षा – शिंदे तुकाराम, प्रयोगातून गणित – गर्जे बी. एस, पुस्तक परिचय – वायकर सर, आभार – अर्जुन घोलप या वेळापत्रकाप्रमाणे शिक्षण परिषद घेण्यात आली.
  संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश देवकाते सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!