जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड जामखेडला रुजू झाल्यापासून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याच शिवाय वाहतुकीला शिस्त लावली. रोड रोमिओचा बंदोबस्त केला. कोरोना काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर जनजागृती केली महाराष्ट्र दिनी भव्य रक्तदान शिबीर आयोजन यामुळे सर्वसामान्य जनतेत एक चांगला अधिकारी म्हणून प्रतिमा निर्माण करणारे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचा आज वाढदिवस सामाजिक संस्था, कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, राजकीय नेते व कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी, विद्यार्थी यांनी शाल श्रीफळ, केक, बुके, पुस्तके यांच्या सह प्रत्यक्षात भेटून फोनद्वारे शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात सर्व सामान्य नागरीकांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ व सर्वसामान्य जनतेचा तारणहार अनेक सामाजिक उपक्रम राबवणारे खाकी वर्दीतील देवमाणूस पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून जामखेड पोलिसांचे मनोधैर्य उंचावले. पोलिसांचा कारभार गतिमान झाला. ‘पेंडिंग’ गंभीर गुन्ह्यातील अनेक आरोपी गजाआड केले. अवैध देशी दारूचे अड्डे उद्धवस्त करण्याचा सपाटा लावला. अफूची शेती करणाऱ्यांनाही अटक केली. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावली. तालुक्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणली, शाळा काॅलेज समोरील रोड रोमिओचा बंदोबस्त केला त्यामुळे वर्षभरात लोकांना हवाहवासा वाटणारा अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली.
जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड जामखेडला रुजू झाल्यापासून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्याच शिवाय त्यांच्या संकल्पनेतून विधायक उपक्रम ही राबविले. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या “जागृती” करिता सोशल मीडियाच्या माध्यमातून राबविलेले अभियान समाजमनावर राज्यकरणारे ठरले. तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले रक्तदान शिबीर, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या दोन्ही गटात समझोता करणे, शहरातील वाहतुकीला लावलेली शिस्त यामुळे वर्षभरातच गुन्हेगारीचा कर्दनकाळ व सर्व सामान्य नागरीकांचा तारणहार अशी ओळख निर्माण केल्याने आज सर्व सामान्य नागरीकांनी पोलीस ठाण्यात जाऊन साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अक्षरशः शुभेच्छा देण्यासाठी अर्धा एक तास रांगेत उभे राहावे लागले एवढ्या मोठ्या शुभेच्छा हिच खरी कामाची पावती आहे.









