Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढावी यासाठी ल. ना. होशिंग विद्यालयात लाकडी शिल्प निर्मिती.

विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढावी यासाठी ल. ना. होशिंग विद्यालयात लाकडी शिल्प निर्मिती.

0
296
जामखेड प्रतिनिधी 
                 जामखेड न्युज – – – 
 ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्राचार्य श्रीकांत  होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक राऊत मुकुंद यांनी चार फूट बाय पाच फूटाची भव्य असे लाकडी शिल्प तयार केले. लाकडी शिल्प तयार करण्या पाठीमागचा उद्देश विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती आणि सौंदर्यदृष्टी वाढावी. निसर्गामध्ये कोणताही घटक पाहताना त्यामध्ये एक सौंदर्यपूर्ण आकार आहे तो आपण पाहताना कसा पाहावा या दृष्टीमध्ये विकास होण्यासाठी त्याचबरोबर शिल्पकलेचे चे विविध प्रकार लाकडी शिल्प, दगडी शिल्प,मातीचे शिल्प,धातूचे शिल्प असे विविध प्रकार विद्यार्थ्यांना  माहिती व्हावी  यासाठी शिल्प निर्मिती केली आहे.
लाकडी शिल्प तयार करून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवले आहे.जेणेकरून विद्यार्थी रोज जाता-येताना पाहतील  व त्यांच्या मनामध्ये आपणही कोणता ही एक छंद झोपासला पाहिजे किंवा एखादा संग्रह तयार केला पाहिजे  हे  बीज विद्यार्थीदशेतच त्यांच्या मनामध्ये तयार होईल.त्यातील काही विद्यार्थी नक्कीच भव्य दिव्य अशी निर्मिती  करतील असा विश्वास वाटतो.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना  कोणत्याही एखाद्या कलेची आवड असल्यानंतर आपल्या मध्ये एक पॉझिटिव्हिटी येते मन आनंदी व शांत राहते .
विद्यार्थ्यांमध्ये संग्रहवृत्ती वाढावी  आणि त्यांच्यामध्ये एखादे स्किल तयार व्हावे  यासाठी  विद्यार्थ्यांनी  उदाहरणार्थ रंगीबेरंगी दगड गोळा करणे,वेगवेगळ्या प्रकारची माती गोळा करणे,वेगवेगळ्या प्रकारचे लाकडांचे छोटे आकार गोळा करणे,वेगवेगळ्या पानांचे आकार गोळा करणे, विविध रंगीत कागद व कापडांचे तूकडे यांचा संग्रह करणे, वेगवेगळी पक्ष्यांची पिसे गोळा करणेआणि एखादे शिल्प तयार करणे  त्यामुळे  स्व निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती वाढावी आणि सौंदर्यदृष्टी निर्माण व्हावी हाच या शिल्प निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश होय. हे शिल्प तयार करताना प्राचार्य श्रीकांत होशिंग, खजिनदार दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी श्री राजेश मोरे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश,अडसूळ योगशिक्षक बाळासाहेब पारखे, रामचंद्र होशिंग, ईश्वर कोळी भाऊसाहेब, अनिल देडे, विशाल पोले, अर्जुन रासकर, मंगेश सावंत, अविनाश नवगिरे, वराट हनुमंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्वजण नेहमीच सहकार्य करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!