ओमायक्रोनचा पहिला रुग्ण डोंबिवली आढळला – राज्याची चिंता वाढली!

0
229
जामखेड न्युज – – – 
सध्या जगभर चर्चेत आलेल्या आणि त्यामुळे संपूर्ण भारतात चिंता व्यक्त होत आणि उपाययोजना सुरू असताना महाराष्ट्रात पहिला ओमायक्रोनचा पहिला रुग्ण समोर आल्याने राज्याची  चिंता वाढली आहे. हा रुग्ण डोंबिवलीत आढळला असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली असून हे सर्वजण निगेटिव्ह आढळल्याने ही दिलासादायक गोष्ट आहे.
 ओमायक्रोन बाधित व्यक्ती हा तरुण असून तो दक्षिण आफ्रिकेतुन  24 नोव्हेंबरला दिल्लीत आला. त्यानंतर तो मुंबईतून डोंबिवलीत आला. त्याला ताप येत असल्याने त्याने आरटीपीसीआर चाचणी केली त्यात तो ओमायक्रोन व्हेरिएंटने कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तो राहात असलेल्या इमारतीमधील नागरिकांनीही आरटीपीसीआर चाचण्या केल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत.
तसेच त्याने ज्या टॅक्सीतुन प्रवास केला त्या ड्रायव्हरची तपासणी पण निगेटिव्ह आली आहे. बाधित तरुणाची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्तांनी दिली आहे..
बंगलोर, गुजराथ मध्ये ओमायक्रोनचे रुग्ण समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातही रुग्ण आढळल्याने राज्यची चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here