जामखेड मध्ये शनिवारी मोफत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर

0
203
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – 
     कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक अपंग दिनानिमित्त मोफत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र  वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा दिव्यांग व्यक्तीनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी केले आहे.
      शनिवार  दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या याशिबीरामध्ये ज्यांनी जुने प्रमाणपत्र ऑनलाईन केलेले आहे, त्यांनी या शिबिरामध्ये येऊ नये. ज्या दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही तसेच ऑनलाईन झालेले नाही. अशाच लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपस्थित राहावे. दि. ४ रोजी सकाळी  ९:०० नाव वाजता नोंदणी सुरू होईल. तरी दिव्यांग व्यक्तींनी या शिबिरास उपस्थित राहावे , शिबिरास येताना दिव्यांग व्यक्तीने आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो असावेत तसेच संबंधित कागदपत्रांचे ओरिजनल व झेरॉक्स सोबत आणावेत.
स्थळ ग्रामीण रुग्णालय जामखेड
वेळ.नावनोंदणी. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here