जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजीचे परिपत्रक राज्य शासनाने घातलेले निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्य शासनाने वरील सर्व बाजूंचा विचार करून महापरिनिर्वणा च्या कार्यक्रमास काही अटी आणि शर्ती घातलेले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणारे लाखो अनुयायी सुज्ञ व covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करणारे आहेत. शासनाने याबाबत अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काही पुस्तकांचे विक्रीचे स्टॉल, खाद्यपदार्थांची दुकाने व इतर व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. आधीच covid-19 सलग दोन वर्षे त्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. शासन एकीकडे लसीकरण 90% झाल्याचे माध्यमातून प्रसारित करत आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी तयारी केली असता शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे व्यावसायिकांचे यावर्षीदेखील कंबरडे मोडणार आहे. तसेच राज्यात इतर कोणत्याही राजकीय सामाजिक व धार्मिक ठिकाणी निर्बंध नाहीत.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्या ठिकाणी सभा पक्षप्रवेश रॅली यांच्यावर कुठलाच निर्बंध सरकारचे दिसत नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमास बंदी घालणं हा शासनाचा सामाजिक भेदभाव दिसून येत आहे. त्यामुळे लाखो अनुयायांच्या मनामध्ये राज्यसरकार बद्दल गैरसमज निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावेत अन्यथा सर्व राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाहीत.
सर्व बांधवांच्या भावना तीव्र असल्याने राज्य सरकारने याचा पुनर्विचार करून योग्य तोसा समाजहिताचा निर्णय घ्यावा. अशी मागणी जामखेड मधील भीमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवाजी ससाने, जोगेंद्र थोरात, गणेश घायतडक, विशाल अब्दुले, अनिल जावळे, सुर्यकांत सदाफुले, रावसाहेब जाधव, बाळासाहेब साळवे आदी भीम अनुयायी उपस्थित होते.