जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील 80% ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले आहे हे विद्यमान आमदार यांचे वक्तव्य चुकीचे आहे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहे.
49 पैकी 23 ग्रामपंचायत या भाजपाच्या आहेत. तर अनेक ठिकाणी काठावरचे बहुमत आहे. त्या ठिकाणी भाजपाचा सरपंच होणार हे निश्चित आहे. आजही लोकांचा भाजपाच्या विकासावर विश्वास आहे. भाजपाने 25 वर्षे विकासाची दहशत निर्माण केली आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढणार असे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज चौंडी येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत,
जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, रवी सुरवसे, नंदू गोरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, प्रसाद ढोकरीकर, चेअरमन संजय कार्ले, पोपट राळेभात, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, प्रविण चोरडीया, केशव वनवे, लहू शिंदे, सरपंच काकासाहेब धांडे, अंकुश शिंदे, गोरख घनवट, पांडुरंग उबाळे, उद्धव हुलगुंडे, शरद हजारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, तालुक्यातील तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीची निवडणूक होती यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 39 ग्रामपंचायती निवडणूक झाली एकुण 417 सदस्यांपैकी पैकी 203 सदस्य भाजपाचे निवडून आहेत. एकुण 49 पैकी 23 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत.
विद्यमान आमदार हे जनतेची दिशाभूल करीत धुळफेक करत आहेत व 80% ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात हे चुकीचे आहे. तर अनेक ग्रामपंचायत या काठावर आहेत अरणगाव, साकत या ठिकाणी भाजपाचाच सरपंच होईल असे ठामपणे शिंदे यांनी सांगितले. आजपर्यंत विद्यमान आमदारांनी कसलाही विकास केला नाही फक्त विकासाच्या गप्पा मारत आहेत. विकासच नाही तर विश्वास कसा ठेवायचा विंचरणा नदी सुशोभीकरण केले पण मशिन बारामती हून आणल्या जामखेड मधिल मशिनला काम दिले नाही. विद्यमान आमदार बोलतात एक व करतात एक यामुळे जनतेचा वर्षभरात विश्वास उडू लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला. भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी आभार मानले.
चौकट
नगर जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत मी स्वतः उमेदवारी करणार नाही पण भाजपा पुर्ण ताकदीने पॅनल उभा करणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले व मी
पॅनल समितीमध्ये आहे.