जामखेड प्रतिनिधी
गट तट विसरून गावाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन गावाच्या विकास प्रक्रियेत पराभूत उमेदवारांनाही सामावून घ्या आता राजकारण संपले समाजकारणास सुरूवात करा असे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत सदस्यांना सांगितले.
आज आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील नवनिर्वाचित सर्वच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सुनिल लोंढे, मनसेचे नेते दादासाहेब सरनोबत, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, संजय वराट, हनुमंत पाटील, विकास राळेभात, विजयसिंह गोलेकर, अमोल गिरमे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर 39 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते यात 417 सदस्य निवडून आले आहेत. या सर्वांचा सत्कार आमदार रोहित पवार यांनी सर्वच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गट तट निर्माण होतात यासाठी बिनविरोध ग्रामपंचायतीचे आवाहन केले याला चांगला प्रतिसाद मिळाला बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीचे आभार मानण्यात आले. ग्रामपंचायत निवडणूक हि सर्वात कठीण असते. हेवेदावे काढले जातात. आता निवडणूक संपली राजकारण बंद समाजकारण सुरू करा मी ग्रामपंचायत साठी गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करील. अनेक ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात होत्या आता आपल्या विचारांचे माणसे आले आहेत.
चौकट
अनेक ग्रामपंचायत सदस्य भाजपाच्या विचाराचे होते पण गावाच्या विकासासाठी व रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये सहभागी झाले.