जामखेड न्युज – – – –
आगामी होऊ घातलेल्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूकी मध्ये मोठे बदल होणार असून जिल्हा परिषदेचे दोन गटा ऐवजी ३ गट होणार आहेत. प्रशासकीय पातळीवर हालचालीना वेग आला आहे. सन २०१६ रोजी जामखेडला ग्रामपंचायत ऐवजी नगरपरिषद झाल्याने तालुक्यातील जिल्हापरिषदेचा एक गट कमी झाला होता.
ADVERTISEMENT

जामखेड शहर वगळता उर्वरित जवळा व खर्डा गट असे दोन गट राहिले होते. सद्यस्थितीला जवळा व खर्डा दोनही गट आरक्षित होते. जवळा जिल्हापरिषद सदस्य म्हणून सोमनाथ पाचारणे व खर्डा गटाचे वंदना लोखंडे असे दोन सदस्य आहेत. हे दोन सदस्य भाजपचे आहेत. तर पंचायत समितीचे 4 सदस्य भाजपचे निवडून आले होते. सुरुवातीला अडीच वर्ष सभापती सुभाष आव्हाड होते तर राजश्री सुर्यकांत मोरे हे विद्यमान सभापती आहेत.
सन २०२१ ची कोरोना मुळे जनगणना झाली नसल्याने तालुक्यात किती गट होणार याबाबत राजकीय नेते व कार्यकार्त्यांमध्ये उत्सुकता होती. त्यानुसार जामखेड तालुक्यामध्ये दोन गटा ऐवजी ३ गट होण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे जामखेडला ३ जिल्हा परिषद गट होणार आहेत. परंतु आजून कोणता नवीन गट होणार याबाबत अजून स्पष्टता नाही. कोणता भाग या नवीन गटाला जोडणार आहेत किंवा दोन्ही गट विभागून तिसरा गट होणार का याकडे आता राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे तीन गट झाल्यास याचा फायदा इच्छुक कार्यकर्त्यांना होणार आहे. एक जिल्हा परिषद गट झाल्यास जिल्हा परिषदेसाठी एक तर पंचायत समितीचे २ सदस्य वाढणार आहे. जामखेड पंचायत समिती मध्ये सद्यस्थितीला 4 पंचायत समिती सदस्य आहेत. नवीन जिल्हा परिषदगट झाल्यास ३ जिल्हापरिषद सदस्य तर पंचायत समितीला हि संख्याबळ 6 वर जाणार आहे त्यामुळे राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना न्याय देता येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.