जामखेड न्युज – – –
भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका व शेतकऱ्यांच्या वतीने आज विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली. आज शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्याकडे कुठलेही पिकं सध्या हातात नाही साखर कारखाने नुकतेच चालु झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे उसाचेही पेमेंट आले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी व आत्ता विद्युत कंपनीने तीन हजार रुपये भरून घ्यावे.प्रमाने परंतु वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते.
ADVERTISEMENT

त्यानंतर नेवासा चे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित झाले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये गळ्यात दोर अडकवत फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकच मोठा गोंधळ उडत धावपळ झाली. परंतु तेथील शेतकरी व आंदोलन करते वेळी दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. नाही तर एका माजी लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी प्राण गमावण्याची वेळ आज नेवासा मध्ये आली होती.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी विद्युत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही फोन करून चर्चा केली. तरीही त्यावर तोडगा निघाला नाही. सर्व आंदोलन करते दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ऑफिसमध्येच ठिय्या आंदोलन करत होते. नंतर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी रोज एक तास वीज चालू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन वीज बिलांची होळी करून आजचे आंदोलन समाप्त करण्यात आले. परंतु येत्या दोन चार दिवसांमध्ये नेवासा तहसील वरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा नेऊन कृषी पंपाचे वीज आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
आंदोलनाला उपस्थित बाळासाहेब मुरकुटे साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलरावजी लंघे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, राजूकाका मते, अशोक टेकणे,बाळासाहेब शिरसागर,इंजीनियर नगरसेवक सुनील वाघ,मनोज पारखे, विश्वासराव काळे, येडूभाऊ सोनवणे, कैलास दहातोंडे, आप्पासाहेब आयनर, दिगंबर गोंधळी,कल्याणराव मते, निवृत्ती जावळे, विशाल धनगर, अण्णापाटील गव्हाणे,रमेश घोरपडे,बाबा डुकरे, राजेश कडू, संभाजी गडाख, अरुण चांदगुडे, विशाल धनगर, सुभाष पवार, महिंद्रआगळे, दिलीप नगरे, बाबासाहेब शिंदे, डुकरे बी.के, राजेंद्र जाधव, किरण जावळे, बापूसाहेब डिके, रमेश घोरपडे, कानिफनाथ सावंत, उमेश चाऊरे, आदिनाथ पठारे, अरुण निपुंगे, रमेश महानुर आदी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.