जामखेड प्रतिनिधी
जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत 27 व 28 तारखेला होणार आहे या बाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाल्यावर लगेच जाहिर केला जाईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.
नगर जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 705 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान झाले 5788 जागांसाठी 13 हजार 194 उमेदवार रिंगणात होते 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या सोमवारी निकाल जाहीर झाले.
जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 417 सदस्यांसाठी निवडणूक होती यापैकी दहा बिनविरोध ग्रामपंचायतीचे 117 सदस्य बाकी 300 पैकी एक जागा आघी रिक्त आहे. तर 299 सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सोमवारी निकाल जाहीर झाले. आता उत्सुकता सरपंच पदाची आहे. अनेक ग्रामपंचायती मध्ये पुर्ण पॅनल आले तर काही ठिकाणी काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे फुटाफुटीच्या व पळवापळवीच्या भीतीने पॅनल प्रमुखांनी आपले सदस्य अज्ञात स्थळी सहलीला रवाना केले आहेत. आता आरक्षण काय निघते त्यानुसार पुढील रणनीती आखली जाणार आहे. सध्या तरी अनेक ठिकाणचे सदस्य विश्वासू माणसांबरोबर सहलीला रवाना केले आहेत. आता सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले कि, सरपंच पद कोणत्या गटाकडे राहणार हे कळणार आहे. तसेच आरक्षणाची सविस्तर रूपरेषाही स्पष्ट करण्यात येईल.
चौकट
अनेक ठिकाणी पॅनल बहुमतात असेल पण सरपंच पदाचे
आरक्षण ज्या वर्गाचे निघणार त्या वर्गाचा उमेदवार बहुमत असणार्या गटाकडे नसणार त्यामुळे बहुमत नसतानाही अनेकांना सरपंच पदाची लाॅटरी लागणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.