जामखेड प्रतिनिधी
दुर्मिळ व संरक्षित जातीच्या श्रुन्घी घुबडाची तस्करी
करताना जामखेड मध्ये सहा जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील पाच व बीड जिल्ह्य़ातील एक व जामखेड मधील एक अशा सात जणांना जामखेड पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले होते वनविभागाने वन्य पक्षी तस्करी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती पण या दुर्मिळ जातीच्या पक्ष्यांची तस्करी रॅकेट शोधण्यासाठी वनविभागाने कंबर कसली व नगर, औरंगाबाद, जळगाव येथिल चार तस्करांना वनविभागाने ताब्यात घेतले त्यामुळे तस्करी प्रकरणात एकुण अकरा आरोपींविरोधात वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. तस्करीचे रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे.

सहा जानेवारी रोजी जामखेड येथिल मिलिंदनगर भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, शेषराव म्हस्के, आबासाहेब अवारे, सचिन राठोड, संग्राम जाधव, अरूण पवार, अविनाश ढेरे यांच्या पथकाने त्या परीसरात छापा टाकून आरोपी 1) लखन उर्फ लक्ष्मण सतिश भोसले वय 19 रा. भवनवाडी ता. भूम,2) राहुल निवृत्ती पवार वय 25 रा. काशिमबाग ता परांडा, 3) दिपक राजाभाऊ गायकवाड वय 27 रा. सिध्देश्वर नगर बीड, 4) गणेश निवृत्ती पवार वय 24 रा. काशिमबाग ता. परांडा, 5) हरी नेमीणाथ काळे वय 19 रा.सामनगाव ता. भुम, 6) ज्ञानेश्वर निवृत्ती पवार वय 20 रा. परांडा तसेच 7) किरण दाहितोंडे जामखेड अशा सात जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या कडे एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत बेकायदेशीर रित्या श्रुन्घी जातीचा घुबड पक्षी तस्करीच्या उद्देशाने वाहतुक करताना आढळून आला. यानंतर सदरची घटना वनविभागाच्या अखत्यारीत येत आसल्याने पुढील कारवाई वनविभागाने केली होती नंतर वनविभागाने या तस्करीचे रॅकेट शोधण्याचा प्रयत्न केला असता. श्रीरामपूर जिल्हा नगर येथील 1) संदिप शेटे
2) लक्ष्मण मोरे या दोघांना 11 जानेवारी रोजी
कन्नड जिल्हा औरंगाबाद येथील रवी राठोड यास 13 जानेवारी रोजी तर चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील वैभवसिंह पाटील यास 18 जानेवारी रोजी या चार आरोपींना वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. व वनविभागाच्या कस्टडीत ठेवले आहे. परत आणखी कोणाचा या तस्करी मध्ये सहभाग आहे याचा शोध महाराष्ट्रभर वनविभाग करत आहे. जामखेड न्युजशी बोलताना वनविभागाने सांगितले की या चार जणांना वनविभागाच्या कस्टडीत ठेवले आहे व आणखी कोणाचा समावेश आहे त्याचा शोध घेत आहोत.

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड, वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे, वनरक्षक के. आय. पवार, आर एस देवकर, वनरक्षक के एस गांगुर्डे, पी एस उबाळे, रामनाथ देवकर, सुरेश भोसले हे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.
दुर्मिळ श्रुन्घी घुबडाची जादु टोणा साठी अंधश्रद्धेतून तस्करी होत असावी असे जामखेड न्युजशी बोलताना वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांनी सांगितले.