विना अपघात पंचवीस वर्षे सेवा करणाऱ्या चालकांना पंचवीस हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार – परिवहनमंत्री अनिल परब

0
213

जामखेड प्रतिनिधी

ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे,
अशा चालकांना यापुढे राज्यस्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. यामुळे चालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एसटी महामंडळाकडून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचं उद्घाटन अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे पार पडलं. यावेळी ते बोलत होते. चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे
चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे, असं परब म्हणाले. ज्या चालकांनी 25 वर्ष विना अपघात सेवा दिली आहे. त्यांना यापुढे 25 हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, असं परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलं आहे. या घोषणेमुळे जामखेड आगारातील चालकांनी आनंद साजरा करत परिवहन मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here