जामखेड प्रतिनिधी
परिसरातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. स्वागत तोडकर यांचे मोफत निसर्गोपचार महाआरोग्य शिबीराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे यांनी केले आहे. तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच डॉ. स्वागत तोडकर यांचे सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरोग्याविषयी व्याख्यान होणार आहे तरी या शिबिराचा व व्याख्यानाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष रमेश आजबे यांनी केले आहे.

23 जानेवारी रोजी होणाऱ्या या भव्य महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले असते. यातुन सुटका व्हावी म्हणून हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा, या शिबिरात उपचार करण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे 7447447283 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 23 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत शिबीर होणार आहे. व सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरोग्याविषयी व्याख्यान होणार आहे. शिबीराचे ठिकाण श्रीराम मंगल कार्यालय नगर रोड आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कामे करून समाजात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. अनेक ठिकाणी पदरमोड करून रस्ते, मंदिराचा जीर्णोद्धार, मुरमीकरण, पेव्हिंग ब्लाॅक टाकून रस्ते, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, कोरोना काळात मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा करण्यात केला आहे. आता आरोग्य शिबीराचे आयोजन केल्याने परिसरातील नागरिकांना पदरमोड करून समाजसेवा करणारा समाजसेवक खरा देवदूत वाटत आहे.