जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड शहरातील नागरिकांना सकाळी जाॅगिंग व व्यायामासाठी शहराबाहेर हवेशीर शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीने पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्ध करून देण्याबरोबरच व्यायामासाठी मार्गदर्शनही करतात
अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्यानंतर शिवनेरी अकॅडमी ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ते म्हणजे जी मुले अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत त्यांना रोजगार उपलब्ध देण्याबरोबरच जामखेडकरांना प्रशिक्षित व सुसज्ज असे कमांडो सेक्युरिटी गार्ड सेवा उपलब्ध करून
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यानुसार आपणस आपल्या संस्था, कार्यक्रम आदिंसाठी सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्यास आपण शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी येथे संपर्क साधावा. आवश्यकतेनुसार नुसार आपल्याला सिक्युरिटी गार्ड उपलब्ध करून दिले जातील. संपर्कासाठी कॅप्टन लक्ष्मण भोरे (सेवा निवृत्त) मोबाईल नंबर : 9158006663, 9922563566 या नंबर संपर्क करावा.
शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अॅकॅडमी, जामखेड तालुक्यातील अशी एक आदर्श संस्था आहे की जिच्यामुळे जामखेड व परिसरातील भागातील विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्टिकोनातून तरूण-तरूणींना सैन्य दलासह विविध अश्या संरक्षण दलात भरती होण्यासाठी योग्य प्रशिक्षण देते. यामुळे या अॅकॅडमीतून मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी भरती झाले आहेत. तसेच जे देशासह राज्यातील विविध अशा संरक्षण दलात जाऊन देशसेवा करू इच्छितात अशा विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी व पालकांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, महाराष्ट्र पोलीस व इतर सर्वच अर्धसैनिक दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र १ जून २०१४ पासून सुरू केलेले आहे.
शिवनेरी अकॅडमी मधून प्रशिक्षण घेऊन आतापर्यंत विविध दलांमध्ये १२० इतके बहादूर विद्यार्थी व विद्यार्थीनी उमेदवार भरती झालेले आहेत व खास करून गरीबांच्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र आहे. याबरोबरच अकॅडमीच्या प्रांगणामध्ये दररोज सकाळी जामखेड शहरातील ३०० ते ४०० पुरुष, महिला, खिलाडी जॉगिंग साठी येत असतात. जामखेडकरांसाठी हे एक सुरक्षित व प्राकृतिक प्रेरणास्थान असून सर्व स्थरातून याचा फायदा घेतात. शिवनेरी हेल्थ क्लब, शिवनेरी अभ्यासिका या माध्यमातून सुद्धा अनेक विद्यार्थी आपला फायदा घेतात. खरोखर निश्चितच जामखेड करांसाठी हे एक प्रेरणास्थान असून जामखेडच्या वैभवात आदर्श अशा शिवनेरी अकॅडमीचे खूप मोठे योगदान आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.




