जामखेड न्युज – – –
ग्रामीण विकास केंद्र जामखेड आणि कोरो इंडिया समता फेलोशिपच्या माध्यमातून दि. १२ रोजी जामखेड तालुक्यातील भटके- विमुक्त समाजाला जामखेडचे नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांच्या हस्ते रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अँड.डॉ अरुण जाधव उपस्थित होते.
ADVERTISEMENT 

” ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेमार्फत मानवी हक्क अधिकार, न्याय, महिला सक्षमीकरण, बालसंगोपन शिक्षण, दलित, आदिवासी, पारधी, भटके-विमुक्त, पारधी विकास आराखडा, वंचीत, निराधार, शोषित, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, लोककलावंत, अन्याय व अत्याचारग्रस्त घटकांसाठी गेल्या २५ वर्षांपासून काम करण्यात येते.
ADVERTISEMENT 

यावेळी नायब तहसीलदार भोसेकर यांनी आपल्या मनोगतात अनुसूचित जमातीमधील केशरी रेशनकार्ड धारकांना पिवळे रेशनकार्ड वाटप, तसेच ज्यांना रेशनकार्ड नाही त्यांना मोफत रेशनकार्ड वाटप करन्यात येणार असल्याची माहिती दिली, तसेच जातप्रमानपत्र ,व आधारकार्ड मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी तात्काळ लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयात जमा करण्यात यावी असे आव्हान त्यांनी केले.
ADVERTISEMENT 

यावेळी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अँड.डॉ अरुण जाधव यांनी आपल्या मनोगतात, ७० वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा भटके- विमुक्त समाजातील नागरिकांना नागरिकत्वचे पुरावे नाही. रहायला घर नाही अशा परिस्थितीत हा समाज जीवन जगत आहे. भटके- विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी त्यांची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
ADVERTISEMENT 

यावेळी संविधान प्रचारक विशाल पवार, तुकाराम पवार, आतिष पारवे, शीतल काळे गणपत कराळे, यांच्यासह विशाल जाधव , मच्छिंद्र जाधव, मदारी मोहम्मद सय्यद, मदारी रहीम सय्यद, मदारी सादिक हुसेन,मदारी सलिम फत्तु, मदारी मुस्तफा मलंग, मदारी हकीम अकबर, मदारी फिरोज छोटू, मदारी फकीर हुसेन, मदारी रमजान कासम आदी उपस्थित होते.