जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
मानवी जीवनामध्ये प्रत्येक मनुष्यजीव हा परम सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो ते सुख भगवंताच्या नामसमरणात व वारीमध्ये आहे. वारकरी भगवंतांचे हे नाम घेत, वारकरी वारीचे मार्गाने पंढरीला निघाले आहेत. आपलं जीवन समर्पित भावनेने जगतांना त्यांना विठ्ठलाचा खूप मोठा आधार वाटतो. असे मत जामखेड नगरपरिषदेचे कार्यक्षम नगरसेवक अमित चिंतामणी यांची व्यक्त केले
ADVERTISEMENT 

विठ्ठल मंदिर येथे आज सकाळी ११ वाजता कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल भजनी मंडळ व भक्ती शक्ती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दरवर्षी प्रमाणेआयोजित करण्यात आला होता.
ADVERTISEMENT 

याप्रसंगी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणी यांच्या मुर्तीचे पूजन करुन पुष्पहार घालून ‘जय
हरी’ नामाचा जयघोष करून पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान विठ्ठल – रुक्मिणी मंदिर, कोर्ट गल्ली, सोनार गल्ली पासून
झाले.
ADVERTISEMENT 

यावेळी ह. भ. प. दत्ता (महाराज) अंबिरकर, ह. भ. प. विजय (महाराज) बागडे, ह. भ. प. दिपक (महाराज) गायकवाड, अर्जुन महाराज रासकर व ५० वारकरी उपास्थित होते.
ADVERTISEMENT 

यावेळी अमित चिंतामणी म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित केली जात आहे. आध्यात्माकडे गेल्या २ वर्षापासून कोरोना मुळे दुर्लक्ष दिसत असताना पुन्हा त्या उमेदीने, त्याच जोशाने, उत्साहान पायी दिंडी चे प्रस्थान होत आहे. तसेच भागवत धर्माची परंपरा असलेल्या पायी दिंडी सोहळा चालावी ही संस्कृती जपली पाहिजे.
या दिंडीसाठी स्वर्गीय विठ्ठल (आण्णा) राऊत यांच्या व ५ ते ६ वारकरी यांच्या सहकार्याने सुरवात झाली. दिंडी हा गर्दीचा विषय नसून, आत्म उद्धाराचा विषय आहे. धर्मासाठी सातत्याने मागे किती लोक काम करतात
यासाठी खूप काय करत असतात. वास्तविक पहाता दिंडी ही पारंपारिक व जूनी प्रथा आहे. ही प्रथा आपली संस्कृती आपण जपली पाहिजे यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पन्नास वारकऱ्यांसह दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली.