जामखेड न्युज – – – –
यावर्षी पावसाने जिल्ह्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना मोठा फटका बसला. मात्र, आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील शेतक-याने फक्त दोन एकरात तब्बल 33 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेऊन रिकॉर्ड केला आहे.
गतवर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील शेतकरी सुदेश वसंतराव कदम यांनी आपल्या शेतात गायत्री 2034 चे सोयाबीन बियाण्याची लागवड केली होती. जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पाहिजे तसे घेतले जात नाही. मात्र, शेतकरी कदम यांनी उन्हाळी सोयाबीन लागवड करून 2 बँगमध्ये 18 क्विंटल सोयाबीन घेतले होते.
लिंबाच्या शेतीने शेतकऱ्याला केले मालामाल, महिन्याकाठी मिळते इतके हजारांचे उत्पन्न
खरीप हंगामासाठी कदम यांनी काही सोयाबीन बियाण्यासाठी घरी ठेवले होते. तर काही सोयाबीन विक्री केले होते. यावर्षी शेतकरी सुदेश कदम यांनी 25 एकरात सोयाबीनची लागवड केली होती. त्यात गायत्री सूरजची दोन बँग, गायत्री 2034 व अन्य सोयाबीनचे बियाणे लावले होते. आता त्यांचे सोयाबीन निघाले आहे.
गायत्री सुरजच्या दोन बँगमध्ये तब्बल 33 क्विंटलचे सोयाबीन झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांना प्रति एकर करीब 16.50 क्विंटलचे उत्पादन झाले. गायत्री 2034चे प्रति एकर 10 ते 12 क्विंटल उत्पादन त्यांना झाले. अन्य सोयाबीनचे उत्पादन यापेक्षा कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन एकरात तब्बल 33 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना भेटी देऊन सोयाबीनबद्दल माहिती जाणून घेतली. या उत्पादनामुळे त्यांना फायदा होणार आहे.
पावसाचा परिणाम नाही
गत काही वर्षांपासून शेतात सोयाबीन घेत आहे. परंतु, यावर्षी सारखे उत्पन्न झाले नाही. सोयाबीनच्या वेळी तीन वेळा किटनाशक व टॉनिकची फवारणी केली होती. गायत्री 2034चे सोयाबीन अर्ली आहे तर गायत्री सूरज सोयाबीनला विलंब होते. त्यामुळे या सोयाबीनवर पावसाचा परिणाम काहीच झाला नाही. सोयाबीनचे पीक पाहण्यासाठी अमरावती, वर्धा, यवतमाळ येथील शेतकरी शेतात आले होते.
– सुदेश वसंतराव कदम, शेतकरी, देऊरवाडा






