जामखेड न्युज – – –
राशीन या महामार्गावरून येताना बापू एकनाथ शेटे (वडील) आणि सागर संभाजी दातीर यांना घरी येताना डांबरी रस्त्यावर एक कासव दिसले. एखाद्या गाडीखाली येऊन ते मारले गेले असते किंवा जखमी झाले असते, त्यामुळे बापू शेटे आणि सागर दातीर यांनी कासवाला घेऊन आले. कासवाचे पुढे माहिती त्यामुळे घरी ठेऊन त्याबद्दल चौकशी सुरू केली. कमलाकर शेटे यांनी इंटरनेटवर कासवाचे पुढे काय करायचे याबाबत चौकशी करून त्यास वनविभागाच्या ताब्यात देण्याचे आवश्यक आहे त्यावरून खेडचे पत्रकार विजय सोनवणे यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पत्रकार विजय सोनवणे यांनी वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनविभागाचे अधिकारी सदर कासवास घेऊन गेले. तसेच कमलाकर शेटे यांनी वनविभागाशी कळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी वन विभाग नाशिक येथे ई-मेल करून कळविले. त्यानंतर अहमदनगर वनविभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सर्व संभधितांना पत्र पाठवून कासव ताब्यात घेण्याचे कळविले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कासव ताब्यात घेतला.
‘अनेक वन्यजीवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे कोणतेही वन्यजीव घरी पाळू नयेत, त्यांची शिकार करु नये. वन्यजीवांना धोका होईल असे काही करू नये. असे वन्यजीव निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. वन्यजीव घरी पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे कुणीही कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता व इतर कोणतीही ऐकीव माहिती ऐकुन वन्यजीव घरी पाळू नयेत किंवा त्यांना धोका होईल असे वागू नये. वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी जनतेची सुद्धा आहे.
कमलाकर शेटे,
अध्यक्ष युक्रांद खेड