नगर  शहरात कुटणखाण्यांवर छापे!! उपअधीक्षक संदीप मिटके यांची धडाकेबाज कारवाई 

0
318
जामखेड न्युज – – – 
शहरातील वाणी नगर तसेच केडगावमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी छापा टाकून धडाकेबाज कारवाई केली. त्यातील तीन पीडित परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
25 ऑक्टोबर 2021 रोजी उपअधीक्षक संदीप मिटके यांना अहमदनगर शहरातील वाणी नगर तसेच केडगाव मध्ये अंबिका नगर येथे कुंटणखाना सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.  त्या माहिती नुसार तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणी नगर, तसेच कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील अंबिका नगर केडगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकला.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपक एकनाथ लांडगे वय 30,  सागर जाधव या आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.
पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ रा. माळीवाडा अहमदनगर याच्या विरुद्ध  कोतवाली पोलिस स्टेशन येथे महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आलेली आहे.
एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. अहमदनगर शहरामध्ये बर्‍याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी पो.कॉ. तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगरदिवे आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here