दादा पाटील महाविद्यालयात अंगणवाडी सेविकांच्या ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिरास सुरुवात. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघात सर्वांगीण विकासाचे नवे मॉडेल.

0
271
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रोहित पवार विविध कृतिकार्यक्रम प्रभावीपणे राबवीत आहेत. राज्यामध्ये विकासाचे नवे मॉडेल म्हणून कर्जत-जामखेडची नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी शासन स्तरावर आणि स्थानिक पातळीवर प्रभावी उपक्रमांची अंमबजावणी सुनियोजित रीतीने आणि सर्वांच्या सक्रीय सहभागातून मतदारसंघात केली जात आहे. जिल्हा परिषद, अहमदनगर, प्रथम शैक्षणिक संस्था आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जत- जामखेड येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम- अंगणवाडी व शाळा स्तर या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आज मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे सुरुवात झाली. मतदारसंघातील सर्व अंगणवाड्यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. पूर्व प्राथमिक वर्गांपासून बालकांना नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे आणि त्यांचा प्राथमिक, माध्यमिक, उच्च स्तरावर शैक्षणिक विकास सुलभ व्हावा या दृष्टीने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदारसंघातील बालकांना सुयोग्य शिक्षण आणि त्यांना घडवणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना अद्ययावत प्रशिक्षण उपलब्ध करून देत मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे.
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम- अंगणवाडी व शाळा स्तर या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्जत- जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. “अंगणवाडी सेविका, बालक आणि पालक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी व्हावा आणि कर्जत-जामखेडचा शिक्षण पॅटर्न संपूर्ण राज्यभरात जावा हा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.”  कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अमोल जाधव, गटविकास अधिकारी, कर्जत, प्रशांत मिटकरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, कर्जत, नारायण हाकाळे, समन्वयक, प्रथम शैक्षणिक संस्था, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे सर्व प्रशिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविका यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here