जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात सुरूवात
सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ३९ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.
दि. २३ शनिवारी ह. भ. प. कल्याण महाराज कोल्हे,
दि. २४ रविवारी ह. भ. प. भागवत महाराज दळवी यांचे किर्तन झाले त्यांनी
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे रसाळ वाणीने निरूपण केले सर्व श्रोते गुणांना मंत्रमुग्ध केले.
दि. २५ सोमवारी जनार्दन महाराज मत्स्येद्रगड, मंगळवारी पोपट महाराज पाटील, बुधवारी दिनकर महाराज शेवगाव कर, गुरुवारी अर्जुन महाराज लाड व्याकरणाचार्य होळ, शुक्रवारी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे हसेगावकर अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी तसेच शुक्रवारी १२ ते ०२ या वेळेत ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच शनिवारी दि. २९ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे किर्तन होईल तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.