जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – –
पत्रकारितेच्या माध्यमातून सुदाम वराट यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मांडत सोडवणूक केली समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आदर्श पत्रकार कसा आसावा हे वराट यांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे. त्यानी आतापर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हिच त्यांच्या कामाची पावती आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी म्हटले.
मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने सुदाम वराट यांना राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार देण्यात आला याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संजय काशिद, शहरप्रमुख गणेश काळे, चंद्रकांत गोरे व इतर शिवसैनिक उपस्थित होते
यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, सुदाम वराट यांची गेल्या बारा वर्षापासुन निर्भीडपणे पत्रकारिता करत समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून दिला तसेच अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांच्या बातम्या मुळे गावातील नदीवर पुल झाला शालेय पोषण आहार योजना सुरळीतपणे सुरू झाली दर्जेदार मालाचा पुरवठा होऊ लागला तसेच देशातील गॅस ग्राहकांचे पंतप्रधानांच्या जाहिरातीवर होणारा खर्च वाचला जाहिरात पंतप्रधानांची होत होती पण खिशाला चटका ग्राहकांच्या बसत होता त्यांच्या बातमीमुळे गॅस बुकिंग करताना होणारी जाहिरात बंद झाली तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कडभनवाडी व पिंपळवाडी येथे बस सुरू झाली यासाठी त्यांनी पाठपुरावा केला यामुळे शालेय मुलांची सोय झाली. सुदाम वराट यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असेही दळवी यांनी सांगितले.






