रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे – तहसीलदार योगेश चंद्रे कै.डाॅ.द.भ.खैरनार यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

0
227
जामखेड न्युज – – – –
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ते आताच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे. तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, या भावनेने मिळालेले समाधान सर्वांत मोठे आहे. त्यातून तुम्ही निभावलेले माणूसपणाचे नाते दिसून येते, असे मत
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जामखेड मधील कै.डाॅ.द.भ.खैरनार यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले
पुढे बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे याचा फायदा प्रत्येक भारतीयांना होतो त्यामुळे प्रत्येक समाजसेवकाच्या प्रित्यर्थ रक्तदान शिबीराचं आयोजन करावे व देशाची सेवा करावी,कै.डॉ. खैरनार यांना विन्र अभिवादन करुन भावपुर्ण अभिवादन करतो.
 यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, कुलथे आण्णा, डॉ. खैरनार, संचालक पोपट राळेभात, प्रविनशेठ चोरडीया, युवामोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, डॉ.महेश मासाळ, ज्ञानेश्वर अंधुरे, डाॅ. गायकवाड, डाॅ.राजेद्र लाड , डाॅ. कटारीया, प्राचार्य श्रीकांत होशिंग,उमेश काका, चंदु कार्ले, संभाजी मुळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here