जामखेड न्युज – – –
ठाकरे सरकार पडणार असल्याच्या तारखा देणार्या भाजप नेत्यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सरकार पडणार की नाही, या भूमिकेतून बाहेर पडा, असा घरचा आहेर पंकजा यांनी दिला.
सत्ताधारी आणि विरोधकांनाही सुनावले
सावरगावच्या भूमीत पंकजा यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधार्यांनी सत्ताधार्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधार्यांना दिला.
धनंजय मुंडेना अप्रत्यक्ष टोला
आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं. आमचं म्हणणे आहे तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करू; पण सध्या राज्यात चाललंय काय? राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहे. महिलांकडे वाकडी नजर करून जरी पाहिलं तर डोळे काढून घेणार्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही. आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी जाब विचारला.






