कोण होणार आयपीएल २०२१ चा विजेता ?

0
193
जामखेड न्युज – – 
 आयपीएल २०२१ स्पर्धेची आज अंतिम सामना असून याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आज शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत.
अशातच या सामन्यात कोणता संघ विजयी होईल याबाबत अनेकजण भविष्यवाणी करत आहेत.हे युद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणार आहे. या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आपली बेस्ट प्लेइंग ११ घेऊन खेळणार यात शंका नाही.
तीन वेळेस ही स्पर्धा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दोनवेळा विजेते ठरलेले कोलकाता नाईट रायडर्स या दोन तुल्यबळ संघातला हा सामना नक्कीच रंगतदार आणि रोमहर्षक होईल, अशी आशा असंख्य क्रिकेट रसिकांना आहे.
एकीकडे सुपरकुल आणि तमाम भारतीय क्रिकेट रसिकांइतकाच जगभराचा लाडका माही विरुद्ध क्रिकेटच्या जनकाला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारा आयन मॉर्गन या दोन महान कर्णधार यांच्या इतकाच सुनील नारायण,
वरुण चक्रवर्ती विरुद्ध दीपक चहर, रवींद्र जडेजा, युवा शुभमन गील विरुद्ध युवा ऋतूराज गायकवाड असा ते १२ कोटी विरुद्ध सहा कोटीचा सामना (विजेते आणि उपविजेते बक्षिसे) असे अनेक कंगोरे या सामन्याचे असू शकतील.
चेन्नईचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना जो यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याने या सामन्याला तो मुकण्याची दाट शक्यता आहे. मागील काही सामने तो संघात याच कारणामुळे नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here