स्वराज ध्वज हा राजकीय कार्यक्रम नाही तो कर्जत-जामखेड मधील जनतेचा स्वाभिमान आहे – सुनंदाताई पवार

0
250
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
     स्वराज्य ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही तो कर्जत-जामखेड मधील लोकांचा स्वाभिमान आहे. सर्व लोकांनी सकाळी लवकर खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्यावर उपस्थित राहुन स्वराज्य ध्वज उभारणीचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड येथे केले

भारतातील सर्वात उंच असणार्‍या  स्वराज्य ध्वजाचे आज जामखेड शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नगररोड येथील विंचरणा नदीच्या काठावरील शंकराच्या मुर्तीला पुष्पहार घालून व स्वराज्य ध्वज्याचे पुजन करुन मिरवणुकीस सुरवात झाली. यावेळी या स्वराज ध्वजाची शहरातुन भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकी दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भिमसैनिक, मुस्लिम बांधव, आडत व्यापारी, शहरातील व्यापारी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते, शहरातील विविध संघटना, जैन संघटना व शहरातील अनेक नागरिक व महीलांनी या ध्वजाचे स्वागत केले. या वेळी शहरातील रस्त्याच्या बाजूला दुतर्फा रांगोळी काढून, दुतर्फा रांगेत थांबून अत्यंत शिस्तमय वातावरणात स्वराज्य ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

   जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली व कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्य ध्वजाचे पुजन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र कोठारी, सुनिल कोठारी, विजय कोठारी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते

     सदरची ध्वज यात्रा ही या नंतर खर्डा या ठिकाणी रवाना झाली. या वेळी आ.रोहित (दादा) पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार यांनी उपस्थितीत असणाऱ्या सर्वच नागरिकांचे पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे अभार मानले व पंधरा तारखेला होणाऱ्या स्वराज्य ध्वज कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थी व कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here