जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
मानव विकास परीषदेच्या जामखेड तालुका सचिव पदी सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मोहंमद लतीफ पठाण यांची निवड झाली आहे. या बाबत नुकतेच जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, अत्याचार, शोषण, गुलामगिरी, दहशत, मागास वर्गीयांवर होणारा अन्याय, त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक मानवी हक्काचे उल्लंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवल शाही कडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर, हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्वसामान्याचे संविधानिक मानवी हक्कासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज . सामाजिक बांधिलकी निस्वार्थ वृत्ती आणि प्रमानिकपणा यामुळे मानव विकास परिषद जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे. या महान कार्यात सहभागी होण्यासाठी नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख व महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष बळवंत मनवर यांनी नुकतेच मोहमंद पठाण यांना निवडीचै पत्र दिले. त्यांच्या निवडीमुळे जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक दिंगाबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले सह अनेक जण उपस्थित होते.






