जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. लवकरच होणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे. आमदार रोहित पवार यांनी सोहळ्याच्या स्थळाची व खर्डा शिवपट्टण भुईकोट किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. परिसरात सामाजिक कार्यकर्त्यां बरोबर स्वच्छता केली व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नियोजनाबाबत चर्चा केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व ७४ मीटर अशा विक्रमी उंचीचा विजयादशमीला प्रतिष्ठापना होणार आहे. ३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे.
दरम्यान खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीच्या कार्यक्रमाची लोकसहभागातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. समानतेचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यासाठी ग्रामस्थ व इतर मंडळींनी जय्यत तयारी सुरू केली आले. किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला जात असून तिथली जुनी टाकी, विहीर देखील साफ केली आहे. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणा-या स्वच्छता मोहिमेत अत्यंत उत्साहाने भाग घेतल्याचं चित्र दिसत आहे.
ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली जात आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. हि अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना होईल आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला जाईल.
सध्या हा स्वराज्य ध्वज मतदारसंघात असून २२० गावांमधे पुजन सुरू आहे प्रत्येक ठिकाणची माती गोळा करून स्वराज्य ध्वजाची उभारणी कामी वापरण्यात येणार आहे. तसेच गावोगावी ढोल ताशा लेझीम पथक माता भगिनींनी कलश घेऊन पुजन करत आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघाला आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून एक दमदार नेतृत्व लाभलेले आहे मतदारसंघाची ओळख देश-पातळीवर झालेली आहे. सुनंदाताई पवार यांच्या पोटी अशा महान रत्नाचा जन्म झाला यातुन उतराई होण्यासाठी मोरे कुटुंबीयांच्या वतीने खंडेरायाच्या पावन भूमीत देवदैठण येथे वीर माता सुनंदाताई पवार यांची पेढे तुला करण्यात आली.