‘मिशन कवचकुंडल’लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन  सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

0
218
जामखेड न्युज – – – 
महाराष्ट्र शासनाच्या दि.8 व 14 ऑक्टोंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या ‘मिशन कवचकुंडल’ कोविड 19 या  विशेष लसीकरण मोहीमेसाठी जिल्हा  प्रशासन सज्ज झाले आहे. या मोहीमेत गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये लसीकरण कॅम्प लावून ज्यांचे लसीकर बाकी आहे. अश्या    व्यक्तींचे  लसीकरण पुर्ण  करण्याचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र   भोसले यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क  फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या मोहिमेला आजपासून जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. यासाठी महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद व नगरपरिषद प्रशासनाचे एकमेकांच्या समन्वयाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हा प्रशासन मिशन कवचकुंडल मोहिमेसाठी मिशन मोडवर काम करत आहे.
अहमदनगर जिल्हयामध्ये दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 18 वर्षावरील एकुण 36 लाख 3 हजार 600 लाभार्थ्यांचे लसीकरण करणे अपेक्षित असून आत्तापर्यंत साधारणपणे 60 टक्के लाभार्थींना पहिला डोस व 21 टक्के लाभार्थींना दुसरा डोस देऊन संरक्षित करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिल्लक राहीलेल्या लाभार्थींचा पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थीचा दुसरा डोस लवकरात लवकर पुर्ण करणे आवश्यक आहे. या उद्दिष्टाची पुर्तता करण्यासाठी जिल्ह्यामध्ये दिनांक 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीमध्ये मिशन कवच  कुंडल कोविड 19 विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याकरीता ग्रामिण भागामध्ये प्रत्येक उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी 4 लसीकरण सत्रे, तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 40 लसीकरण सत्र असे एकुण दैनंदिन 650 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे. मोहिमेकरीता अहमदनगर जिल्हयासाठी पुरेशा प्रमाणात लससाठा उपलब्ध झालेला आहे. या मोहिमेकरीता आरोग्य विभाग, महसूल विभाग, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग ई. विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
मिशन कवच कुंडल कोविड 19 लसीकरण मोहिमेकरीता जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीची बैठक आज घेण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील ज्या नागरीकांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी मिशन कवच कुंडल कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, अहमदनगर, डॉ. राजेन्द्र भोसले, अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर, श्रीमती राजश्रीताई घुले पाटिल, उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व शिक्षण समिती जिल्हा परिषद, अहमदनगर प्रताप होळके पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संदिप सांगळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here