जामखेड प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची व कर्मचार्यांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय ओळखून सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष व समाजसेवक रमेश आजबे यांनी रूग्णालय आवारात स्वखर्चातून बोअरवेल घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवल्याने रूग्णालयातील रूग्ण, नातेवाईक व कर्मचार्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने समाधान व्यक्त केले.
येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे पेशंट दररोज येतात बरोबर नातेवाईक असतात तसेच अनेक कर्मचारी येथे राहतात यांचे पिण्याचे पाण्याचे खुपच हाल होत होते. ही अडचण समाजसेवक रमेश आजबे यांनी ओळखली व स्वखर्चातून बोअरवेल घेतला चांगले पाणीही लागले लगेच विद्युत मोटार बसवली यावेळी सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष रमेश आजबे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय वाघ, दादासाहेब ढवळे, सागर कोल्हे, सुग्रीव सांगळे, जमीर सय्यद, सचिन खैरे, सुदाम राऊत यांच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
रमेश आजबे यांनी जामखेड शहरात अनेक समाजोपयोगी कामे पदरमोड करून केलेली आहेत. बीड रोड पासून ल. ना. होशिंग विद्यालय व जामखेड महाविद्यालय हा अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता मोकळा करून त्यावर पेव्हिंग ब्लाॅक टाळल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खुपच फायदा झाला आहे. एक ते दीड किलोमीटर अंतर वाचलेले आहे. तसेच ल. ना. होशिंग विद्यालयाच्या समोर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आजबे यांनी वृक्षारोपण केले व या झाडांना संरक्षण जाळी बसवली व संपूर्ण उन्हाळ्यात स्वतः टॅकरद्वारे पाणी घातले यामुळे आता ही झाडे चांगले झाले आहेत. तसेच जिजाऊ नगरमध्ये रस्ता तयार करून बंदिस्त गटारे बांधकाम केले यामुळे येथील दुर्गंधी नष्ट झाली आहे.
आता ग्रामीण रुग्णालयात बोअरवेल घेतल्याने रूग्ण, नातेवाईक व कर्मचार्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आजबे यांचे आभार मानले.