जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड पंचायत समिती कार्यालयात वाचनालय सुरू करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केला असून तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद-पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच समाजातील नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार कमीत कमी एक व जास्तीत-जास्त आपणास वाटेल तितकी पुस्तके वाचनलयास भेट द्यावीत असे पोळ यांनी आवाहन केले आहे.
प्रशासकीय कामकाज करत असताना अधिकारी-कर्मचारी यांना अनेक बाबींचा ताण तणाव येत असतो. विविध विषयांवरील वाचन केल्यानंतर आपणाला या ताण तणावाला सामोरे जाण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय वाचन ही सर्वांसाठीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वाचनाने आपल्या वैचारिक कक्षा रुंदावतात. जगातील नवनवीन घडामोडीचे ज्ञान मिळते. नवीन संकल्पना समजतात. त्या अनुषंगाने आपल्या कडील विषय हाताळताना आपल्याला या ज्ञानाची खूप मदत होते. या नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांना कामकाजा व्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग होऊ शकतो. यासाठी कार्यालयात वाचनालय असणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले. पुस्तके कुठल्या विषयांची असावीत याबाबत अजिबात बंधन नाही. आपण आपल्या क्षमतेनुसार कमीत कमी एक व जास्तीत जास्त आपणास वाटेल तितकी पुस्तके वाचनलयास भेट द्यावीत ही नम्र विनंती.
तरी नागरिकांना नम्र आवाहन आहे की आपण जामखेड पंचायत समिती कार्यालयात होत असलेल्या वाचनालयासाठी पुस्तके देण्यासाठी सहायक प्रशासन अधिकारी भाऊसाहेब शिर्के (मो.नं – 9822193342), कनिष्ठ प्रशासन अधिकारी विजय चौसाळकर (मो.नं – 9975929397) कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील कानडे (मो.नं – 9975773777) यांचेकडे जमा करावीत. तसेच अधिक माहितीसाठी गटविकास अधिकारी जामखेड प्रकाश पोळ (मो.नं7588204128), सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार(मो.नं – 8208145511), कृषी अधिकारी अशोक शेळके (मो.नं – 7588542624) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गटविकास अधिकारी पोळ यांनी केले आहे.