जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथिल कांचन खाडे या विद्यार्थ्यांनीने ग्रामीण कृषी कार्यक्रमातंर्गत कमी खर्चात शुन्य ऊर्जेवर आधारित शीत कक्ष उभारले आहे. कांचन खाडे ही अदित्य कृषी महाविद्यालय बीड येथे शिक्षण घेत आहे.
डोळेवाडी येथे सुभाष खाडे यांच्या शेतात शित कक्ष उभारून गावातील लोकांना प्रात्यक्षिक करून दाखवले. शुन्य ऊर्जेवर आधारित शीत कक्ष कशाप्रकारे फायदेशीर ठरते. उभारणी कमी खर्चात खर्चात आणी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून हे शीत कक्ष उभारता येतो. या शीतकक्षाचा वापर फळे व भाजीपाला साठवण कालावधी वाढविता येतो. याबाबत कांचन खाडेने उपस्थितांना माहिती दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. टी. मुंडे, प्रा. प्रा. डाॅ. भुतडा, डॉ. जी. बी. गोपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.










