लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांचा अभिष्ठचिंतन सोहळा हरिकिर्तनाने संपन्न – हनुमंत पाटील यांनी केला अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

0
214

जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
       धांगडधिंगा डिजे फ्लेक्स लावण्यापेक्षा हनुमंत
 पाटील यांनी आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अध्यात्मिक कार्यक्रम घेतला परिसरातील अध्यात्माचा वारसा चालवणाऱ्या महाराजांचा सन्मान केला हा कार्यक्रम खुपच स्तुत्य आहे असे मत आखील भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाजन बोधले यांची व्यक्त केले.
   कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साकतचे हनुमंत पाटील यांनी खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम महाराज गड या ठिकाणी हभप पुरूषोत्तम महाराज यांच्या हरिकिर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी संपुर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
      खर्डा येथिल सितारामगडावर हभप पुरुषोत्तम महाराज याचे हरिकिर्तन झाले यावेळी अखिल भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले,  हभप कैलास महाराज भोरे, सिताराम गडाचे मठाधिपती हभप महालिंग महाराज, महासांगवी देवस्थानच्या मठाधिपती हभप राधाताई सानप महाराज, हभप रामकृष्ण रंधवे बापु महाराज, हभप महेबुब महाराज शेख आदी उपस्थित होते.
 तसेच आमदार रोहित  पवार यांचे पिताश्री राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कीर्तन कार्यक्रम पार पाडला यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी पंचायत समितीचे सदस्य विजयसिंह गोलेकर, सरपंच हनुमंत पाटील आदी सह मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.
        यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा आगळावेगळा वाढदिवस संपुर्ण मतदारसंघात साजरा केला मोठ्या प्रमाणावर रक्तदान झाले, ऐंशी हजार वह्या पुस्तके जमा झाले तसेच हनुमंत पाटील यांनी अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान व्हावा म्हणून हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.
     आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार म्हणाले की, हनुमंत पाटील यांनी सिताराम गड या पवित्र ठिकाणी पवित्र कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी संतांची मांदिअळी जमवली आहे. या सर्वाच्या आशिर्वादाने आमदार रोहित पवारांना संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची ताकद मिळो.
     हभप कैलास महाराज भोरे म्हणाले की, गेल्या दिड वर्षापासुन लाॅकडाउन मुळे महाराज मंडळी घरात बसून होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महाराज मंडळींना एकमेकांना भेटता आले हनुमंत पाटील यांनी सर्व वारकरी संप्रदायातील लोकांना एकत्र आणत एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे. यावेळी गडाचे महंत महालिंग महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here