हॅप्पी बर्थडे कुंती, तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो, रोहित पवारांच्या खास शुभेच्छा!!! योगायोग जोडीचा वाढदिवस एकाच दिवशी

0
306
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा आज २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांच्या चाहत्यांत मोठे उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी आपल्या लाडक्या रोहितदादांच्या वाढदिवसाची जय्यत तयारीची इच्छा होती. मात्र आ.रोहित पवार यांनी अगोदरच, कोरोनाच्या काळात कोणताही उत्सवी कार्यक्रम न घेता कार्यकर्ते, चाहत्यांनी सामाजिक उपक्रम राबवावे, विशेष करून गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करावे, रक्तदान शिबिरे घ्यावीत असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने कर्जत,जामखेडच नवे तर महाराष्ट्रातील अनेक भागात  वह्या आणि शालेय साहित्य मोठ्या संख्येने संकलित झाले आहेत. तब्बल ऐंशी हजारावर वह्या जमा झाल्यापासून त्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. तसेच अनेक गावांत रक्तदान शिबिरे आयोजित करून मोठ्या संख्येने रक्तांच्या पिशव्यांचे संकलन झाले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि चाहत्यांत उत्साह असतानाच खुद्द आ.रोहित यांच्या साठी आजचा दिवस अजून एका कारणासाठी ‘खास’ आहे. कारण आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच पत्नी कुंती यांचाही वाढदिवस असतो. यानिमित्ताने आ.रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पत्नी कुंती यांना शुभेच्छा देताना,..
‘घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या जीवनसाथी सौ. कुंतीचाही माझ्यासोबतच आज वाढदिवस. यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो,ही प्रार्थना!!!
कुंती मगर-पवार या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांच्या कन्या आहेत. आ.रोहित आणि कुंती यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली असून या दांपत्याला दोन मुली आहेत. आ.रोहित आणि कुंती यांची लग्नगाठ जोडण्यात काका अजितदादांचा मोठा वाटा आहे. कुंती यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक याविषयात पदवी घेतली आहे. मात्र आ.रोहित यांच्या राजकीय व्यस्त कार्यक्रमात त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी कुटुंब सांभाळण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र घर सांभाळताना विविध सामाजिक विशेषतः महिला विषयक सामाजिक कार्यात त्या नेहमी सहभाग घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here