जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
२५ रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड वतीने नवीन तहसीलदार योगेश चंद्रे यांचा तहसील ऑफिस जामखेड या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी तहसीलदार चंद्रे यांनी जामखेड तालुक्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी माझ्या परीने मदत होईलच व यासाठी सर्वजण मिळून काम करूया असेही आवाहन केले.
प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांचा सत्कार करून ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे,पर्यवेक्षक, रमेश आडसुळ,योगशिक्षक बाळासाहेब पारखे, समारंभ प्रमुख संजय कदम व विशाल पोले उपस्थित होते.






