जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी तसेच जामखेड विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन मनसुखलाल कोठारी यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल आज जामखेड -कर्जत आमदार रोहितदादा पवार यांनी सांत्वनपर भेट दिली यावेळी स्वर्गवासी मनसुकलाल कोठारी यांचे पुत्र मा सरपंच सुनील कोठारी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पारस कोठारी यांना भेटून सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,विजय कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, संदेश कोठारी संकेत कोठारी ,तेजस कोठारी यांना आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी रोहित पवार हे स्वर्गवासी मनसुखलाल कोठारी यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई कोठारी यांना सुद्धा भेटले आणि सांत्वन केले.
यावेळी उद्योगपती अनिलसेठ कांकरिया पुणे, प्रा. मधुकर राळेभात, राहुल उगले, डॉ वारे, नगर परिषदेचे मुख्यअधिकारी मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते






