सोयापेंड आयात तातडीने थांबवावी;  तालुक्यात सोयाबीनची सरकारी खरेदी तातडीने सुरू करा : युवक क्रांती दल

0
271
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
दोन आठवड्यांपूर्वी सोयाबीनला साधारणपणे १० हजार प्रती क्विंटल दर होता. आता त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल ५५०० ते ५७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० टक्के दर पडले आहेत. केंद्र सरकारने १२ लाख टन सोयापेंड आयात केली आहे. परिणामी सोयाबीनचे दर पडले आहेत. सोयाबीनचे भाव अजून मोठ्या प्रमाणावर पडणार आहेत, असे म्हणून व्यापारी शेतकऱ्यांना घाबरवत आहेत. तसेच हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. हमीभावापेक्षा दर कमी होणार नाहीत याचे आश्वासन सरकारने देऊन शेतकऱ्यांना विश्वास द्यावा. तसेच सरकारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करावी, अशी मागणी युवक क्रांती दल (युक्रांद) तालुका जामखेड संघटनेतर्फे आज करण्यात आली. यासंबंधीचे निवेदन आज तहसील कार्यालय जामखेड येथे नायब तहसीलदार मनोज भोसीकर यांना देण्यात आले. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे,
वंचीत बहुजन आघाडीचे नेते ॲड अरूण जाधव, अनिल घोगरदरे, विशाल राऊत, अजय नेमाने, तुकाराम घोगरदरे विशाल रेडे, योगेश लोंढे, संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार हे उपस्थित होते.
महागाई वाढली तरी चालू हंगामात फक्त ७० रुपयांनी हमीभावमध्ये वाढ –
शेतमाल पिकवण्यासाठी लागणाऱ्या खते, बियाणे, औषधं, औजारे, यंत्र, ते यंत्र चालण्यासाठी लागणारे इंधन (डिझेल) यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र त्याच वेळेस शेतमालाचे भाव मात्र संघटितपणे पाडण्याचं काम केले जात आहे. टोमॅटोचा लाल चिखलं नुकताच सगळ्यांनी पाहिला आहे. २०२०-२१ मध्ये सोयाबीनला ३८८० प्रति क्विंटल भाव होता, तर चालू हंगामात ३९५० रुपये. इतर महागाईच्या तुलनेत हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणं गरजेच होतं. त्यामुळे हमीभावामध्ये वाढ करण्यात यावी. अशी मागणी युवक क्रांती दल (युक्रांद) करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here